Saturday, February 5, 2011

अनाकलनीय निर्णय...

          मुंबई हायकोर्टाने कालच एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना ज्योतिषशास्त्र हे एक विज्ञान असल्याचा निकाल दिला... खरंतर याबद्दलचा पूर्ण निकाल मी वाचलेला नाही किंवा मी या क्षेत्रातला जाणकारही नाही... तसेच यातून सन्मानीय न्यायालयाचा अवमान करण्याचाही उद्देश नाही... मात्र तरीही एक सामान्य नागरीक म्हणून या निकालावर प्रतिक्रिया देताना काय म्हणावं हेच कळत नाहीये.. अनाकलनीय !!! इतकंच म्हणावं लागेल... म्हणजे याबाबतीत माझे वैयक्तिक विचार तर फारच टोकाचे आहेत.. पण ते जरी बाजूला ठेवलं तरी विज्ञान ??? अरे यार प्लीज... पहिली गोष्ट म्हणजे याला विज्ञान म्हणून मान्यता देताना त्याची सत्यता कोणी आणि कधी तपासली हा सर्वात मोठा प्रश्न पडलाय.. माझ्या माहितीप्रमाणे आजपर्यंत कोणीही समोर येऊन खुलं आव्हान  (अं.नि.स. ने वारंवार असं खुलं आव्हान दिलंय) घेऊन हा ज्योतिष वगैरे प्रकार सिद्ध करून दाखवला नाहीये... त्यामुळे एकवेळ लगेच त्याला ढोंग ठरवू नका, पण त्याला विज्ञान म्हणून मान्यता देण्यासाठीही काहीच बेस नाहीये.
     हेहे...मला खरंच हसायला येतं यार हा विषय निघाल्यावर... म्हणजे खरं सांगायचं तर यात समोरची बाजू ऐकून घ्यायला मला खरंच आवडतं.. की कोणी कसा याचा पुरस्कार करू शकतं यार... म्हणजे अगदी साधं म्हणायचं झालं तर च्यायला काय ते एका राशीचे करोडो लोक... या सगळ्यांचं एखाद्या ठराविक दिवसाचं नशीब एकच कसं असू शकतं रे ?? हेहे.. म्हणजे बघा हा... आता समजा तिकडे बिल गेट्स आणि इकडे मुंबईच्या फूटपाथवरचा एक भिकारी.. हे दोघं जर एकाच वेळी जन्माला आले असतील... किंवा काय ते ज्या काही नियमांप्रमाणे त्यांची रास एकच असेल, तर यांचं भाग्य समान निघणार होय !!! व्वा व्वा !!! ते इंग्रजी होरोस्कोप तर अजूनच हॉरर आहे !!! म्हणजे ठराविक अमुक दिवसांच्या दरम्यान जन्म घेतलेले त बिलियन्स, ट्रिलियन्स लोक.. या सगळ्यांचं नशीब चार ओळींत सारखंच... यापेक्षा मोठा जोक नाही होऊ शकत यार... 
           सगळ्यात हाईट म्हणजे आयुष्यातल्या सगळ्यात महत्त्वाच्या क्षणी आपण या गोष्टीवर विसंबून राहतो.. काय तर छत्तीसच्या छत्तीस गुण... च्यायला त्या इंग्लंडने चांगलाच धडा शिकवलाय या लोकांना... येथील नियमाप्रमाणे कोणी असं सांगून लग्न देणार असेल आणि नंतर त्यांचा घटस्फोट झाला, तर त्या सो कॉल्ड ज्योतिषाला भरभक्कम नुकसानभरपाई द्यावी लागते.. नाहीतर मग गप्प आधीच सांगायचं की हे सगळं निव्वळ मनोरंजनासाठी आहे.. सगळ्या पाश्चिमात्त्य गोष्टींचं अनुकरण करतो ना आपण.. मला वाटतं याबाबतीतही ते करावं मग.. आज २१व्या शतकातही आपल्या समाजातील सुशिक्षित म्हणवणाऱ्या लोकांनी असल्या गोष्टींच्या आहारी जावं यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट नाही रे कोणती.. खरंच वाईट वाटतं.. म्हणजे आज लोकशिक्षणाचा ठेका घेणाऱ्या मीडियालाही यासाठी जबाबदार ठरवावं लागेल. किंबहुना फक्त त्यांनाच जबाबदार धरावं लागेल.. अरे ऐर्यागैर्यांची गोष्ट सोडा, पण सुशिक्षितांची वृत्तपत्रे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वृत्तपत्रांतातही साप्ताहिक भविष्याच्या कॉलम्नला अजूनही महत्त्वाचे स्थान आहे. आज ज्या चॅनेलने याबद्दल चर्चा आयोजित केली त्यांच्याच चॅनेलवर सकाळीसकाळी ते भगरे (गुरूजी??? plzzzzz) (वाईट यमक शब्द येत होता तोंडात,पण सेन्सॉर केलाय.. ;) ) का कोण येऊन लोकांना त्यांचं भविष्य सांगत असतात. मीडियानेच असल्या गोष्टींचे उदात्तीकरण करणे यापेक्षी वाईट काहीच असू शकत नाही रे...
     मला कल्पना आहे की आपल्यापैकीही अनेकजण वर्तमानपत्रांतील आपलं भविष्य मोठ्या चवीनं वाचत असणार.. काही जण हा काय काही लिहित सुटलाय काही माहीत नसताना असंही म्हणतील (अशा लोकांच्या कमेन्ट्सची आतुरतेने वाट पाहतो आहे)... पण मला वाटतं की या ज्योतिष वगैरे संबंधित लोकांना त्यांचे खरेपण सिद्ध करण्याची पुरेपूर संधी यापूर्वी दिली गेली आहे. माझ्या माहितीप्रमाणे नरेन्द्र दाभोळकर यांच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीने वेळोवेळी या लोकांना आपली सत्यता दाखवून देण्याचे खुले आव्हान दिले आहे. त्यासाठी लाखोंचं बक्षिस ठेवलं आहे. आपल्या या शास्त्रावर इतका जर विश्वास असेल तर का कोणी पुढे नाही आलं मग यावेळी... आम्हाला अं.नि.स. च्या सर्टिफिकेटची गरज नाही असं म्हणून प्रत्येकवेळी हे पळवाट शोधत आले आहेत.. अत्यंत दुर्देवाने आजच्या निकालाने ते काही कायदेशीर कारवाईतून मोकाट सुटत आहेत.. अर्थात ही लढाई पुढे वरच्या कोर्टात जाईल म्हणा.. पण कोर्टाच्या निकालाची वाट पाहण्यापेक्षा आपणच सद्सद्विवेकबुद्धीचा उपयोग करून अशा चाळ्यांना लांब ठेवण्याची गरज आहे असं वाटतं... 

(दोन्ही मतप्रवाहांच्या बहुमूल्य कमेन्ट्सचे सहर्ष स्वागत आहे... )

12 comments:

  1. मस्त लिहिलेत............

    ReplyDelete
  2. धन्यवाद प्रदीप..

    ReplyDelete
  3. अगदी खरे बोललात ! पण काय करणार ? ज्याची त्याची श्रद्धा! अंध श्रद्धा म्हण्याची माझी बिशाद नाही. आपली ती श्रद्धा , दुसरयाची ती अंध श्रद्धा ! तेव्हा श्रद्धा, असावी अंध श्रद्धा नको, असा मधला मार्ग चोखाळावा. डोक्याला कलई करण्यात point नाही. कस ?

    ReplyDelete
  4. एकदम एक्झॅट बोललात बघा... हेहे..
    हो पण खरंच, हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न असला तरी एक मर्यादा ओलांडल्यानंतर तो सामाजिक हिताला बाधा आणू लागतो. ते टाळावेच लागेल.

    ReplyDelete
  5. mala lekhatil kahi goshti sorry akkha lekhach patala naahi!!!!!!!

    A.n s ch certificate ghene kahi jaruruche mala vatat naahi!!!!!!!
    Udya pratyek devalala A.N.S ch certificate ghyav lagel!!!!
    AAni kelela navas purna naahi zala mag kay Devavar khatala chalavnar ka????/
    Maza ya ANDHSHRADDHA NIRMULAN valyanvar vishwas naahi!!!!!!
    Je buabaji aani Bhondugiri yanchya viruddha je kele te stutya ch aahe!!!!!

    Pan ekda shalet ANS chya Shinde mhanun konitari Bai aalya hotya!!!!
    Tya buabaji aani Bhondu giri yavar bolalya tyacha tar mihi tivra virodh karato.
    pan itar kahi prashnanchi uttar tyanni he as asel nahitar tas asel ashi dili!!!! Jar he lok suddha bhakitach vartavnar astil tar mag tyanchyat aani jyotishi yanchyat farak kay???????
    .
    .
    Ek tar purn Andhashraddha thevavi nahitar guru la suddha tu mazya guru honyachya laykicha aahes he siddha karayla lavav!!!
    .
    .
    Science (SHASTRA) mhanje aapan shala colg madhye shikato te!!!!!!
    He suddha kahitari assume kelyashivay pudhe sarkatach nahi!!!
    mhanje ithe suddha tark lavala jato!!!!
    Mhanje pahile ANDHSHRADDHA aani tyavar adharit laws aapan shiktoy!!!
    te Gondas science chya navakhali!!!!!(vruttapatranmule yethe gondas shabda vaparla.
    Atishayokti alankaracha purepur vapar kelay!!
    Pratyek batami ji mala patat naahi tyat ya vakyasarkhe vakya aste ......CHYA GONDAS NAVAKHALI)
    .
    .
    Kontihi goshta hi nivval ANDHASHRADDHE pasunach suru hote!!!!!
    -
    SHRIDHAR AGARKAR

    ReplyDelete
  6. पेपरवाले छापतात ते भविष्य काही विश्वसनीय नसते हे नक्कीच. राशीनुसार आपले भविष्य अचूक सांगता येत नाही हे खरे पण कुंडली जी ज्योतिष शास्त्रात मूळ पाया आहे त्यानुसार आपल्याला अचूक भविष्य सांगता येऊ शकते. अर्थात हे ही ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करणार्‍या व्यक्तीवर अवलंबून आहे.

    ReplyDelete
  7. @ श्रीधर : सॉरी टू से, पण तुझ्या बोलण्यातलं मला काहीच क्लियर झालं नाही.. माझा मुद्दा वेगळाच आहे.. तू फक्त अं.नि.स. च्या काही गोष्टी खटकल्या म्हणून हा स्टॅण्ड घेतलायस असं वाटतं.. तू फक्त एका वाक्यात जे बरोबर म्हणालास तेवढंच मला म्हणायचं होतं.. की हे भोंदूगिरी वगैरे प्रकार थांबलेच पाहिजेत.. आणि ज्योतिषाच्या नावाखाली चालू असणारा प्रकार हा कसा भोंदूगिरीचा असतो हो मी उदाहरणं देउन पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे..

    ReplyDelete
  8. @ Ameya: ANS cha ekun kaarya hech mala patat naahi , he khara aahe!!!! Pan ha DILSE lekh tu ANS chya base varach lihila aahes!!!
    Mhanun ANS cha fol pana dakhvinyacha mihi prayatna kela aahe!!!!!!!1
    .
    .
    Mi rastyavar basanarya Bhondu Babanvishayi , kivva Paise ukalnarya lokanvishayi bolat nahiye!!!!!
    Je kharach JYOTISH SHASTRACHE abhyasak aahet te kadhich asle DHANDE karat nahit!!!!!
    .
    .
    Tisra mudda mi var asa patavinyacha prayatna kela aahe ki ANDHASHRADDHA hi keval DEV,DHARM yavar adharit naste!!!!!
    .
    Ex. Ekhada manus jyacha science shi javalcha sambandh naahi!!!
    Jar keval newton mhanto mhanun Mechanics che niyam manya karayla lagla tar ti tyachi ANDHASHRADDHACH aahe!!!!!!
    .
    Tyach pramane ekhadya manasane virodh karaycha mhanun NEWTON chya mechanics la virodh ela kontahi abhyas na karta tar tihi tyachi ANDHASHRADDHA zali!!!!
    .
    Same tuza hi zalay!!!
    Adhich tu manya kelays ki tu ya vishayatla JANKAR nahis.
    Mag kontya base chya adharavar tu yala ANAAKALANIYA mhantos??????/
    Mhanje hi suddha ek ANDHASHRADDHA zali ki DEAVA varchi Nahi ,Dharma Varchi naahi,
    pan ANS var hi tuzi ANDHASHRADDHA zaliye!!!!!
    (mala tuzyavar kontahi aarop karaycha nahiye pan Keval ANS mhante ti ANDHASHRADDHA he manane kitpat barobar aahe yavar vichar karavas yasathi mi tuzach udaharan dile aahe!!!!!!)
    -
    SHRIDHAR AGARKAR

    ReplyDelete
  9. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  10. सध्या सगळीकडे ज्योतिष, टॅरो कार्ड, फेंगशुई, वगैरेंनी बजबजपुरी माजली आहे. कुठलही चॅनेल लावा दिवसभरातून एकदा हे दाखवलं जातंच. नेहमीची मनोरंजनाची चॅनल्स किंवा धार्मिक- अध्यात्मिक प्रवचने दाखवणारी चॅनल्स एकवेळ समजूही शकतो, पण रात्री ११:३० आणि सकाळि ७ वाजता "न्यूज" चॅनलही तेच दाखवतात???? :-O काय आचरटपणा आहे?? दाढी वाढवलेले, काळे कपडे घातलेले, टिळे आणि रुद्राक्ष चित्र विवित्र मणी असलेल्या माळा, पाचही बोटात अंगठ्या घातलेले बाबा - बुआ याचा मारा न्यूज चॅनलवरुन करतात तेव्हा डोकं फिरतं व त्याही पुढे ते बघणार्‍यांच्या बुध्दिची किव येते. "ब्रॅन्डचे" नाव देत नाही, वाचून समजेलच - पण दादरसारख्या महागड्या ठिकाणी ऐन "स्टेशनसमोरच्या" ३ जागा पटकावून मोफत ज्योतिषी सल्ला व सर्टिफिकिटसकट खडे - लॉकेट देऊन १ महिन्यात परीणाम न दिसल्यास पैसे परतीची १००% हमी देणारे, पावसाळ्यातील कुत्र्यांच्या छत्र्याप्रमाणे उगवत आहेत. गाडितल्या बाबा बंगालींच्या "मेरे किये हुए काम को काटने वाले को दस हजार इनाम" वाल्या पोस्टर्सनी उच्छाद मांडलाय. खरंतर यावर खूप बोलण्यासारखं आहे फक्त प्रश्न एकच ... पण लक्षात कोण घेतो???

    ReplyDelete
  11. Mast :)
    Ekikade mhantat ki jyotish shastra prachin rushinni develope kela aahe.. Dusarikade mothmothya jyotish tadnyanchi vaktavye khoti thartat.. Vishwas konawar thevaycha..
    Baki mahattvachya cases sodun nyayalay jyotish shastrabaddal nirnay ghenyat busy aahe.. Waah..

    By the way, check my blog out.. inkpaperheart.blogspot.in

    Regards :)

    ReplyDelete