(आजकाल अनेकांना इंटरनेटवर खासकरून फेसबुकसारख्या सोशल नेटवर्किंग साइट्सवर मराठीत लिहिण्याची इच्छा असते. त्यासाठी मग बर्याचदा गूगल ट्रान्सलेटरचा उपयोग केला जातो. मात्र त्यातही अनेक अडचणी उद्भवतात. या सगळ्यावर जालीम उपाय म्हणजे युनिकोडचा वापर... अनेकांकडून याची विचारणा झाली होती. त्यासाठी गेल्या मराठी भाषा दिनानिमित्त (२७ फेब्रुवारी) माझा "लोकसत्ता"मधील हा पूर्वप्रकाशित लेख येथे ब्लॉगवर टाकत आहे.)
कोणतीही भाषा टिकायची झाल्यास बदलत्या काळातील नवनवीन तंत्रज्ञानाशी जुळवून घेणे त्या भाषेला क्रमप्राप्त असते. याच अनुषंगाने आजच्या नव्या पिढीबद्दल बोलायचे झाल्यास त्यांच्या दैनंदिन जीवनातील बहुतांश वेळ हा संगणकासमोर बसून कामकाज करण्यात किंवा सोशल नेटवर्किंग करण्यात जात असल्याचे दिसून येते. आणि नेमक्या याच मोक्याच्या माध्यमात इंग्रजीच्या तुलनेत मराठीची पीछेहाट झाल्याचे अपल्या निदर्शनास येईल. कारण संगणकावर इंग्रजीच्या मानाने मराठीची वापर हा नगण्यच आहे. आता यावर बऱ्याचदा संगणकावर मराठीत लिहिण्याची सोयच उपलब्ध नाही किंवा मराठीत लिहिणे खूप जिकिरीचे आहे, कोण तो मराठीचा टंक (फॉन्ट) आपल्या संगणकात उतरवून घेणार अशी नानाविध कारणे ऐकू येतात. मात्र खरं सांगायचं तर यात अजिबात तथ्य नाही. संगणकावर मराठी वापरासंबंधीचे लोकांमध्ये असलेले अज्ञान हेच मोठे दुर्दैव आहे. कारण मुळात संगणकावर मराठी वापरणे हे अतिशय सोपे असून त्यासाठी काही शोधाशोध करण्याची किंवा कोणताही टंक उतरवून घेण्याची गरज नाही. आपल्यापैकी काही मराठी भाषा प्रेमी सध्या उपलब्ध असलेल्या विविध टंकांचा उपयोग करून मराठीत मजकूर लिहितही असतील. मात्र अनेकवेळा हा मजकूर इतरांना पाठविल्यावर त्यांच्या संगणकावर तो विशिष्ट टंक उपलब्ध नसल्याने निव्वळ ठोकळेच दिसतात. मात्र या अडचणीवर देखील मात करणारा अत्यंत सोपा मार्ग आपल्याला उपलब्ध आहे याची आपल्याला कल्पना नाही. संगणकावर अत्यंत सहजरीत्या मराठी व इतर अनेक स्थानिक भाषांचा वापर करता यावा यासाठी ‘युनिकोड’ ही संकेतप्रणाली आपल्या संगणकावर मुळातच अस्तित्वात असते. त्यासाठी कोणताही टंक आपल्या संगणकात उतरवून घेणे आवश्यक नाही. हे वाचल्यावर अनेकांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला असेल. तसेच ही प्रणाली कशी वापरायची? त्याचा खर्च किती? असे अनेक प्रश्नही पडले असतील. तर अशा या ‘युनिकोड’च्या वापरासाठी कोणताही खर्च नसून ‘विंडोज’ कार्यकारी प्रणालीसोबत (operating system)) आपल्याला ती अगदी विनामूल्य मिळत असते. मात्र अनेकवेळा आप्लया संगणकात ती कार्यरत केलेली नसते. परंतु अवघ्या चुटकीसरशी आपण हे ‘युनिकोड’ कार्यरत करून संगणकावर इंग्रजीऐवजी मराठीत लिहू शकतो.
आपल्या संगणकावर ‘युनिकोड’ कार्यरत करण्यासाठी पुढीलप्रमाणे कृती करा.
१.Start- Contro panel- Regional & Language option या क्रमाने टिक करा (मार्क करा).
२. यानंतर एक चौकट येईल. चौकटीच्या वरच्या भागातील Language या पर्यायावर टिक करा.
३. ‘विंडोज एक्स्पी’ची चकती (सीडी) संगणकात टाका.
४. आता चौकटीच्या खालील भागातील install files for complex script and right-to-left languages (including Thai) हा पर्याय निवडा.
५. यानंतर apply आणि ‘ ok पर्यायांवर टिकटिकवा.
६. संगणक बंद करून पुन्हा सुरू करावा (रिस्टार्ट) अशी सूचना येईल. त्याप्रमाणे कृती करा.
७. तुमच्या संगणकावर ‘युनिकोड’ कार्यप्रणाली कार्यरत होईल.
यानंतर तुमचा कळफलक (की-बोर्ड) मराठीत करण्यासाठी पुढीलप्रमाणे कृती करा.
१. Start- Contro panel- Regional & Language option- Languages या क्रमाक्रमाने टिक करा.
२. चौकटीतीली details हा पर्याय निवडा.
३. यानंतर येणाऱ्या चौकटीतील add पर्यायावर टिक करा.
४. पुन्हा एक नवी चौकट येईल. यामध्ये add input language या पर्यायाखालील विविध भाषांच्या सूचीतून मराठी भाषा निवडा.
५. ok वर टिक करा.
६. याआधीच्या चौकटीतील apply आणि ok वर पण टिक करा.
७. आता तुमच्या संगणकाच्या तळपट्टीवर उजव्या बाजूस MA असे लिहिलेले दिसेल. त्याऐवजी EN असे दिसत असल्यास एकाच वेळी Alt आणि Shift या दोन्ही कळा दाबा. म्हणजे तेथे MA असे दिसेल. याचा अर्थ तुम्ही आता युनिकोडच्या माध्यमातून मराठीत लिहू शकता.
एकदा का तुम्ही ‘युनिकोड’ कार्यरत केले, की संगणकावरील संपूर्ण जग तुम्हाला मराठीत उपलब्ध होईल. याचा वापर करून तुम्ही मराठीत ई-टपाल (ई-मेल) पाठवू शकता, इंटरनेटवरील मराठीतील माहिती शोधू शकता, इतकंच काय तर आपल्या आवडत्या ऑर्कुट, फेसबुकवर सुद्धा मराठीतून गप्पा-गोष्टी करू शकता.
मग आता वाट कसली पाहताय? तडक उठा आणि कामाला लागा. आपल्या मातृभाषेविषयी अभिमान प्रक ट करण्यासाठी यापेक्षा उत्तम माध्यम शोधूनही सापडणार नाही. त्यामुळे युनिकोड वापरा आता तुमचाही संगणक चालवा शुद्ध मराठी मध्ये..
युनिकोड वापरासंबंधीची विस्तृत माहिती marathi-vikas.blogspot.com तसेच यासारख्याच इंटरनेटवरील अनेक संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=52259:2010-03-04-16-16-23&catid=41:2009-07-15-03-58-17&Itemid=81

वरील पद्धतीचे दोन तोटे आहेत:
ReplyDelete१.विंडोज xp ची सीडी सगळ्यांकडे असेलच असे नाही.
२.युनिकोडचा कळपाट लक्षात ठेवणे कठीण आहे.
यावर उपाय म्हणून गुगलचे मोफत सॉफ्टवेअर वापरता येईल:
http://www.google.com/ime/transliteration/
मी स्वतः हे सॉफ्टवेअर वापरतो आणि इतर कोणत्याही सॉफ्टवेअर पेक्षा ते चांगले वाटले.
I think microsoft indic marathi language tool is better.
ReplyDelete@ नितिश- अरे तुझे दोन्ही प्रश्न नेहमीच उपस्थित केले जातात. पहिली गोष्ट म्हणजे युनिकोडवरही फोनेटिक कळपाट उपलब्ध आहे. काही आणखीन बदल करून ते ही करता येतं. आणि हो विंडोजची सीडी सगळ्यांकडे नसली तरी ती फक्त एकदाच सुरूवातीला आवश्यक असते. त्यानंतर त्याची गरज नाही. एखाद्या इंजिनिअरकडून वगैरै आपण ती घेऊ शकतो.
ReplyDelete@ hasunhasun... पहिली गोष्ट म्हणजे तर मला हे नाव खूपच आवडलंय..हेहे.. असो.. पण धन्यवाद प्रतिक्रियेसाठी...
ReplyDeleteखरंतर व्यक्तिश: मी हा प्रकार कधी वापरून पाहिलेला नाही.. त्यामुळे त्याबद्दल काही प्रतिक्रिया नाही देता येणार.. परंतु मला वाटतं, युनिकोडमध्येही काहीच कमतरता नाहीये.. आणि ही प्रणाली सर्वमान्य करण्यात आली आहे.. आतातर बहुतांश संगणकांत ती आधीपासूनच बसविलेली असते.. त्यामुळे काही डाऊनलोड वगैरे करण्याचीही गरज नाहीये...