Wednesday, April 6, 2011

ब्लॉगला द्या वेबसाइटचे स्वरूप

नमस्कार मंडळी, खरंतर मी कोणीही सॉफ्टवेअर इंजिनियर नाही. परंतु स्वत:चा ब्लॉग तयार करताना आलेल्या अनुभवांचा फायदा इतर सर्वसामान्य (म्हणजे माझ्यासारख्या एचटीएमएलचा गंध नसलेल्या) ब्लॉगर्सना व्हावा यासाठी ही पोस्ट टाकत आहे.

आपण बऱ्याचदा मराठी तसेच इंग्रजीमधील अनेक ब्लॉग्स पाहतो, ज्यांच्या यूआरएलमध्ये ब्लॉगस्पॉटचा उल्लेख असतो, मात्र त्या ब्लॉगला असं काही सजवलेलं असतं की एखादी वेबसाइटही त्यासमोर मार खाईल. आपण मराठी ब्लॉग विश्वाच्या माध्यमातून असे अनेक ब्लॉग्स पाहिलेही असतील. यापैकी बहुतेक जण हे स्वत: इंजिनियर असल्याने किंवा त्यांना तत्सम ज्ञान असल्याने  ब्लॉगला असं रूपडं देणं त्यांना सहज शक्य असतं. काही दिवसांपासून मी सुद्धा माझ्या ब्लॉगमध्ये वेबसाइटप्रमाणेच विविध विषयांचे स्वतंत्र टॅब असावेत यासाठी  प्रयत्न करत होतो. तेव्हा खुद्द ब्लॉगरनेच आता याप्रकारची सोय उपलब्ध करून  दिल्याचे लक्षात आले.

तुम्ही माझ्या ब्लॉगवर पाहू शकता की, वर वेबसाइटप्रमाणे क्रिकेट, स्पोर्ट्स, ओपन ग्राऊंड असे विविध टॅब्स दिले गेले आहेत. या प्रत्येक टॅबवर क्लिक केले असता तुम्हाला त्या सेक्शनमधील सर्व लेख एकाच ठिकाणी सापडतील.

खरंतर ब्लॉगरने ही (स्टॅटिक पेजची) सुविधा अबाऊट मी, कॉन्टॅक्ट यांसारखे स्थायी टॅब बनविण्यासाठी सुरू केली आहे. मात्र आपण त्याचा वापर यापेक्षाही महत्त्वाच्या गोष्टींसाठी करू. या सुविधेचा वापर करून आपण आपल्या ब्लॉगवरील एका विषयाशी संबंधित सर्व लेख एकाच ठिकाणी उपलब्ध करून वाचकांना वाचायला सोप्पं पडेल अशी योजना करू शकतो.

तुमच्या ब्लॉगवरही याप्रमाणे एका विषयासंबंधिचे सगळे पोस्टस् एकत्र करायण्यासाठी खालीलप्रमाणे कृती करता येईल.

1. नेहमी आपण नवीन पोस्ट टाकण्यासाठी ज्या न्यू पोस्ट ऑप्शनवर क्लिक करतो, तेथेच क्लिक करा.

2. आता पोस्टिंग या टायटल अंतर्गत न्यू पोस्ट, एडिट पोस्ट आणि एडिच पेजेस असे तीन ऑप्शन्स आपल्याला दिसतील. यातील एडिट पेजेसवर क्लिक करा.

3. याठिकाणी आपण जास्तीत जास्त 10 पेजेस तयार करू शकतो. नवीन पेज (टॅब) तयार करण्यासाठी न्यू पेजवर क्लिक करून पेज टायटलमध्ये आपणास हवे ते टॅबचे नाव द्या. उदा. मी क्रिकेटचा एक स्वतंत्र टॅब तयार केला आहे.

4. आता टायटल खालील मोठ्या चौकटीत मी माझ्या त्या विषयाअंतर्गत येणाऱ्या सगळ्या लेखांची नावं लिहून त्या मजकूरालाच त्या लेखाची लिंक जोडली आहे. हे करणं  अतिशय सोप्पं आहे. त्या टॅबअंतर्गत यावा अशा तुमच्या एखाद्या लेखाचं नाव लिहा. त्यानंतर ते सिलेक्ट करून वरच्या बारवरील लिंक या ऑप्शवनर क्लिक करा. एक विंडो ओपन होईल.

5. आता एका वेगळ्याच विंडोत तुमचा ब्लॉग ओपन करून त्या ठराविक लेखाच्या शीर्षकावर क्लिक करा. आणि वरच्या अॅड्रेसबारवरील संपूर्ण यूआरएल कॉपी करून क्रमांक 4 ची कृती केल्यावर येणाऱ्या विंडोतील वेब अॅड्रेससमोरील मोकळ्या चौकटीत पेस्ट करा. म्हणजो त्या लेखाच्या शीर्षकावर क्लिक करताच वाचक ती संपूर्ण पोस्ट वाचू शकेल.

6. याप्रकारे त्या टॅब अंतर्गत येणारे सर्व लेख या यादीत तुम्ही जोडू शकता. हे झाल्यावर खाली पब्लिश पेजवर क्लिक करा. याप्रकारे एक-दोन नाही तर तब्बल 10 निरनिराळे टॅब तुम्ही तयार करू शकता.

आय होप, ही माहिती काही सर्वसामान्य ब्लॉगर्सना उपयोगी पडली असेल. तसं असल्यास आपला प्रतिसाद नक्की कळवा. तसेच जर कोणी इंजिनियर असल्यास याप्रकारे या स्टॅटिक पेजेसचा आणखी चांगल्याप्रकारे वापर कसा करता येईल याबद्दल त्यांनी मार्गदर्शन करावे ही विनंती.. बाकी इतर सगळ्यांनीच आपल्या शंका मोकळेपणाने विचारा. एकमेकां सहाय्य करू... तत्त्वाने चालत राहू...काय?

6 comments:

  1. छान माहिती. मला प्रयत्न करुन पाहायला नक्कीच आवडेल. ब्लॉगर्सचे विश्व हे हौशी लोकांचे असल्याने अश्या प्रकारच्या माहितीच अदानप्रदान हे विश्व अधिक अधिक सुंदर आणि तांत्रीकदृष्ट्या सफाईदार होण्यास मदत होईल.

    ReplyDelete
  2. अगदी बरोबर मैत्रेयजी.. आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद !!!

    ReplyDelete
  3. अमेय,
    फारच मस्त.खूप मस्त आणि महत्वाची माहिती दिलीस.खर तर ह्या पद्धतीच्या सोई ह्या, मी सुद्धा बऱ्याच ब्लॉग वर बघतो पण च्यायला हे आपल्याला कसं जमणार?हा नेहमीच प्रश्न पडायचा.तुझी हि पोस्ट मी बुकमार्क करून ठेवलीय त्या मुळे आता जेव्हा वेळ येईल किंवा पडेल तेव्हा खूप उपयोगी पडेल.खर तर तुझ्या ह्या पोस्टला किमान पक्षी नुसत्या धन्यवादाचे तरी बरेच अभिप्राय असावयास पाहिजे होते असे माझे स्पष्ट मत आहे पण जशी काय फार शाई खर्च होणार नि प्रचंड वेळ वाया जाणार ...अगदी असा थंड प्रतिसाद बघून माझे मन नक्कीच खट्टू झाले.माझ्या अंदाजाने मराठी टायपिंगची अजून नीटशी ओळख न झाल्याने सुद्धा हि बोंब असावी अशी सुद्धा एक शक्यता आहे.असो.
    तुझ्या ब्लॉगला भेट देणारे गुगलच्या http://www.google.com/transliterate/marathi ह्या लिंकचा वापर ह्या पुढे मराठीत टायपिंग साठी करतील असा विश्वास आहे.हे माझ आपल उगाच छोटस योगदान.तेवढाच खारीचा वाटा
    दिलेल्या माहिती बद्दल पुन्हा एकवार धन्यवाद.

    ReplyDelete
  4. खूप खूप धन्यवाद प्रतिक्रियेबद्दल.. मलाही तेच वाटायचं.. शेवटी एकदाचं ते कळल्याने जो काही आनंद झाला ना... मग एक अख्खी पोस्टच लिहून काढली. बाकीच्यांचं जाऊद्या. पण तुमच्या या दोन कमेन्टनीच त्याचं आता पुरेपूर सार्थक झाल्यासारखं वाटतयं..

    ReplyDelete
  5. chaan aartikal lihale aahe. hyaacha mi purvich upayog kela aahe.
    krupayaa majya blog la bhet dhyaa.

    " Dewan-Ghewan "

    http://mnbasarkar.blogspot.com

    ReplyDelete
  6. हा view एकदम सही वाटला!! :)
    http://www.full2dilse.blogspot.com/view/snapshot

    ReplyDelete